मुंबईकरांचं वाढलं टेन्शन ! पुणेकरांनंतर आता जीबी सिंड्रोमचा मुंबईमध्ये शिरकाव

मुंबई : पुणेकरांनंतर आता मुंबईकरांचं टेन्शन वाढलं आहे. पुण्यात जीबी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या वाढत असताना आता मुंबईमध्ये शिरकाव झाला आहे. जीबी सिंड्रोमचा पहिला रुग्ण मुंबईत आढळला आहे. आतापर्यंत मुंबईत या आजाराचा एकही रुग्ण आढळला नव्हता. पण आता मुंबईत पहिला रुग्ण आढळला आहे, त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरात एका रुग्णाला गुडलेन बॅरे सिंड्रोम जीबीएस आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरी परिसरात ही व्यक्ती राहते. या व्यक्तीवर सध्या महापालिकेच्या सेवन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अंधेरी पूर्व परिसरात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळल्यामुळे स्थानिक आमदार मुरजी पटेल यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णाची भेट घेतली. रुग्णालयाच्या अधिष्ठातांना भेटून या ठिकाणी जीबीएस रुग्णांसाठी ५० विशेष बेड राखीव ठेवाव्यात. शिवाय या रुग्णांवर महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या आहेत. पुणे शहरात जीबी सिंड्रोमची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही काही रुग्ण आढळले आहेत. पुण्यात रुग्णांचा आकडा १७३ वर पोहचला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात १७० संशयीत जीबीएस बाधित रुग्णांपैकी १४० रुग्णांना जीबीएस झाल्याचं निदान झालं आहे. २१ रूग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. या आजारामुळे आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. जीबीएसचे रुग्ण वाढल्यावर पुणे महापालिकेला जाग आली आहे. पुण्यातील दूषित पाणी आढळलेल्या आरओ प्लांटला महापालिकेकडून टाळं ठोकण्यात आलं आहे. सिंहगड रोड परिसरात १९ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. आरो प्लांटमध्ये कॉलिफॉर्म बॅक्टेरिया आढळला आहे.
जीबीएसची लक्षणं –
- पाय, हातांमध्ये अचानक अथवा येणे
- डायरिया
- काय काळजी घ्याल
पिण्याचे पाणी दूषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. - पाणी उकळून पिणे.
- अन्न स्वच्छ आणि ताजे असावे.
- वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.
- शिळे अन्न आणि अर्धवट शिजलेले अन्न (चिकन, मटण) खावू नये.
- नागरिकांनी घाबरून न जाता या आजाराची लक्षणे आढल्यास त्वरीत शासकीय रुग्णालयात जावे.