राजकारण

“सरकारला याची किंमत मोजावी लागेल”; खासदार निलंबनावर शरद पवारांचे विधान

वी दिल्ली : संसदेत आतापर्यंत एकूण १४१ खासदारांचं निलंबन करण्यात आले असून देशभरात हा मुद्दा चर्चेत आहे. लोकसभेत दोन तरुणांनी घुसखोरी करून स्मोक कँडलचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर त्यावरून विरोधकांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन करण्याची मागणी लावून धरली. यामुळे मोठा गदारोळ झाला. यावर कारवाई म्हणून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे मिळून आत्तापर्यंत १४१ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरककरवर जोरदार टीका केली आहे.

संसदेच्या कामाकाजावेळी विरोधी पक्षांच्या १४४ खासदारांचं निलंबन करण्यात आल्याप्रकरणी दिल्लीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत सरकार विरोधात मोर्चा काढला आहे. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. यावेळी विरोधकांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी विरोधकांना नजर अंदाज करुन सरकार कारभार करु पाहत आहे. देशातील जनता सगळं पाहत आहे, सरकारला याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला.

पुढे ते म्हणाले, “चार-पाच दिवसापूर्वी जे लोक संसदेत घुसले. ते लोक संसदेचे सदस्य नव्हते. ते सभागृहात कसे आले आणि त्यांना पास कोणी दिला? यावर सभागृहात चर्चा होणं गरजेचं आहे. याबाबतची मागणी विरोधकांनी केली होती. खासदारांची ही एकच मागणी होती. यावर सरकारकडून उत्तर अपेक्षीत होते. पण सरकारनं याबाबत काही उत्तर दिलं नाही. याउलट याबाबत चर्चेची मागणी करणाऱ्या खासदारांचे निलंबन केले. आजपर्यंत संसदेत असं कधी घडलं नव्हते.”

दरम्यान, संसदेच्या सुरक्षाभंगाच्या प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवेदनासाठी गेल्या आठवड्यापासून विरोधी सभागृहामध्ये आक्रमक झाले आहेत. अशातच काल लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या ४९ खासदारांना निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या १४१ पर्यंत पोहोचली आहे. राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांमधून खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button