मनोरंजन 

‘फायटर’च्या रिलीज आधीच हृतिक रोशन झाला मालामाल! ओटीटीवरही येणार चित्रपट

वृत्तसंस्था : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या ‘फायटर’ रिलीज होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत. काही वेळातच प्रेक्षकांची ही उत्सुकता शमणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ‘फायटर’ या चित्रपटाची मोठी चर्चा सुरू आहे. नुकतेच सेन्सॉर बोर्डाने U/A प्रमाणपत्र देण्यापूर्वी चित्रपटात काही मोठे बदल केले होते. त्यामुळे नुकतेच निर्मात्यांनी या चित्रपटातून एक गाणे देखील काढून टाकले आहे. या एरियल अ‍ॅक्शन चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेटही समोर आली आहे. रिलीजपूर्वीच चित्रपटाचे ओटीटी हक्क कोट्यावधींमध्ये विकले गेले आहेत.

‘फायटर’ चित्रपट चित्रपटगृहांमध्ये रिलीज होण्यापूर्वीच हृतिक रोशन मालामाल झाला आहे. प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने ‘फायटर’चे हक्क विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे. रिलीजच्या किती दिवसांनंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे, हे देखील समोर आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘फायटर’चे डिजिटल अधिकार नेटफ्लिक्सने खरेदी केले आहेत. ‘फायटर’चे डिजिटल अधिकार कोट्यावधींमध्ये विकले गेले असले, तरी त्यातून निर्मात्यांना नेमके किती पैसे मिळाले? ही माहिती अद्याप समोर आलेली नाही. ‘फायटर’ थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर ५६ दिवसांनी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

सध्या सगळीकडेच हृतिक रोशनच्या ‘फायटर’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगद्वारे चांगली कमाई केली आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंगचे आकडे पाहता या चित्रपटाला बंपर ओपनिंग मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘फायटर’ हा चित्रपट आज म्हणजेच २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. याआधी गेल्या वर्षी सिद्धार्थ आनंदने ‘पठान’ चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला होता. या चित्रपटाने जगभरात १००० कोटींचा व्यवसाय केला होता. त्यामुळे आता ‘फायटर’कडूनही अपेक्षा वाढल्या आहेत.

‘फायटर’ची संपूर्ण टीम या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटातील संवाद, फाईट सीन्स आणि हृतिकची अ‍ॅक्शन सर्वांनाच आवडणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पहिल्यानंतर पाकिस्तानच्या काही स्टार्सनीही ट्रेलरवर कमेंट केल्या आहेत. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी दिल्लीत आयएफएस अधिकाऱ्यांसाठी ‘फायटर’चे विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button