गुन्हे

पिंपरीत ३ पिस्तुले आणि ४ जिवंत काडतुसे बाळगणारे सराईत गुन्हेगार जेरबंद

पिंपरी : चिंचवडच्या दरोडा विरोधी पथकाने सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून ३ गावठी पिस्तुले आणि ४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. वीरभद्र रघुनाथ देवज्ञ, राहुल बसवराज सर्जन आणि अमोल फिलिप साळवे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई सुमित देवकर आणि गणेश सावंत यांना बातमीदारकडून माहिती मिळाली की, वीरभद्र हा सराईत गुन्हेगार आळंदी घाटाजवळ आला आहे. त्याने पिस्तुल बाळगले आहे. अशी माहिती मिळताच तत्काळ त्याठिकाणी जाऊन सापळा रचून वीरभद्रला ताब्यात घेण्यात आल. त्याच्याकडील एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

या गुन्ह्याचा अधिक तपास केल्यानंतर राहुल बसवराज सर्जन आणि अमोल फिलिप साळवे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर साळवेकडे दोन गावठी पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली. अशी एकूण तीन गावठी पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे दरोडा विरोधी पथकाने जप्त केली आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी हे करत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button