भारत

IRCTC ची घोषणा; ऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्यांसाठी ‘हा’ चार्ज द्यावा लागणार नाही

वृत्तसंस्था : लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल तर तिकिट दोन ते तीन आठवडे बुकिंग करावे लागते. इतकंच नव्हे तर, कधीकधी महिनाभर आधीही तिकिट बुक करावे लागत. अन्यथा वेळेवर तिकिट बुक करायला गेल्यावर पंचायत होते. पहिले रेल्वेचे तिकिट बुक करायचे म्हटलं की स्थानकात जाऊन लाइनमध्ये उभं राहावं लागायचे किंवा मग एंजटला अधिक पैसे देऊन तिकिट काढावे लागायचे. मात्र आता डिजीटलच्या युगात रेल्वेचे तिकिट काढणेही सोप्पं झालं आहे. रेल्वेच्या IRCTC अॅप व वेबसाइटच्या माध्यमातून तुम्ही लगेचच तिकिट बुक करु शकता.

आयआरसीटीसीकडून प्रवाशांना IRCTC अॅपवरुन ई-वॉलेटची सुविधा दिली जाते. या माध्यमातून तुम्ही आरामात कोणतेही पेमेंट गेटवे चार्जेस न देता रेल्वे तिकिट बुकिंग करु शकता. तुम्ही यामाध्यमातून तात्काळ तिकिटदेखील बुक करु शकता. पेमेंट अप्रुव्हल सायकल नसल्याने अन्य अॅप्सच्या तुलनेत लवकर तिकिट बुक होईल. इतकंच नव्हे, तर जर तुमचं तिकिट कॅन्सल झाले तर रिफंड देखील आयआरसीटीसी ई-वॉलेटमध्येच येईल.

IRCTC eWallet चे फायदे

१ ) आयआरसीटीसी ई-वॉलेटमध्ये कोणतेही पेमेंट गेटवे चार्जेस लागत नाहीत.

२) यात तुम्ही थेट तुमच्या बँक अकाउंटमधून टॉप-अप करु शकता.

३ ) जर तुमचं तिकिट कॅन्सल होत असेल तर रिफंडदेखील याच वॉलेटमध्ये येईल

४ ) पेमेंट अप्रुव्हल सायकल नसल्याने तिकिट बुक करण्यासाठी कमी वेळ लागतो.

आयआरसीटीसी ई-वॉलेटच्या माध्यमाने तिकिट बुक कसे कराल?

१.  तिकिट बुक करण्यासाठी सर्वात पहिले आयआरसीटीसीच्या अधिकृत बेवसाइटवर जावे लागेल. त्यानंतर इथे पासवर्ड आणि आयडी टाकून लॉग-इन करा.

२.  जर तुम्ही पहिल्यांदा आयआरसीटीसीच्या ई-वॉलेटच्या आयआरसीटीसी एक्सल्कूसिव्ह बटनावर क्लिक करा. त्यानंतर आयआरसीटीसी ट्राजेक्शन पासवर्ड टाका. जर तुमचा पॅन कार्ड आणि आधार कार्ड व्हेरिफाइड असेल तर आयआरसीटीसी ई-वॉलेटमध्ये पुन्हा व्हेरिफिकेशनची आवश्यकता भासणार नाही. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा आणि पुन्हा लॉगइन करा.

३.  आता तुम्हाला आयआरसीटीसी एक्सस्युसिव्ह टॅब ई-वॉलेट बटणावर क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यानंतर अॅपवर तुम्हाला सगळे पर्याय दिसायला लागतील.

४.  तुम्ही भीम यूपीआय, पेटीएम, अॅमेझॉन पे यूपीआय, नेट बँकिग, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून वॉलेटमध्ये कमीत कमी 100 ते 10,000 हजार रुपयांपर्यंत डिपॉजिट करु शकता. त्यानंतर तुम्हाला तिकिट बुक करता येऊ शकते.

५.  या वॉलेटमध्ये असलेल्या बॅलेन्सचा वापर करुन तुम्ही आयआरसीटीसीच्या वेबसाइट आणि अॅपच्या माध्यमातून तिकिट बुक करु शकताय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button