देशविदेशभारत

आजपासून देशभरात लागू झाला एक वाहन, एक फास्टॅग

वृत्तसंस्था : पल्याकडे राष्ट्रीय महामार्गावर टोल भरावा लागतो. आता टोलनाक्यांवर जास्त वेळ थांबायला लागू नये म्हणून Fastag सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. आता यातही १ एप्रिलपासून बदल करण्यात आले आहेत. वन व्हेईकल, वन फास्टॅग १ एप्रिल २०२४ पासून एनएचएआय या संस्थेने लागू केला आहे. देशभरात वन व्हेईकल, वन फास्टॅग लागू करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे. ‘एक वाहन, एक फास्टॅग’ द्वारे फक्त एका फास्टॅगच्या वापराला प्रोत्साहन देण्याचे सरकारी मालकीचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उद्दिष्ट आहे. यापुढे एकापेक्षा जास्त फास्टॅग काम करणार नाहीत. ज्याच्याकडे एका वाहनासाठी अनेक फास्टॅग आहेत ते आजपासून म्हणजेच १ एप्रिल २०२४ पासून ते सर्व वापरू शकणार नाहीत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पेटीएम FASTag वापरकर्त्यांना येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन, NHAI ने ‘एक वाहन, एक FASTag’ उपक्रमाचे पालन करण्याची अंतिम मुदत मार्च अखेरपर्यंत वाढवली होती. पण आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यामुळे NHAI कडूनही याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात, भारतीय रिझर्व्ह बँकने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना १५ मार्चपर्यंत त्यांची खाती इतर बँकांमध्ये हस्तांतरित करण्याचा सल्ला दिला होता. फास्टॅगद्वारे देशभरातील राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर टोल टॅक्स वसूल केला जातो. ही संकलन प्रणाली भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या वतीने चालविली जाते. सध्या देशभरात त्याचे आठ कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत. हे टोल मालकाशी जोडलेल्या प्रीपेड किंवा बचत खात्यातून थेट टोल पेमेंट करण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्रज्ञान वापरते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button