मनोरंजन 

दाक्षिणात्य तीन साऊथ सुपरस्टारशी स्क्रिन शेअर करणार शाहरुख

वृत्तसंस्था : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा किंग शाहरुख खानला एक ६ स्क्रिन शेअर करताना पाहण्याचा विचार चाहत्यांनी कधी तरी केला असेल. पण हे कधी सत्य होईल हा स्वप्नात देखील विचार कोणाला आला नसेल. आता अशी चर्चा आहे की रजनीकांत यांचा आगामी टायटल न ठरलेल्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक लोकेश कनगराज यांच्या या चित्रपटात मोहन आणि विजय सेतुपति असणार आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांना आतुरता आहे ती २२ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या टीझरची.

रजनीकांत आणि लोकेश कनगराजच्या कथित ‘थलाइवर 171’ या चित्रपटाचं शूटिंग जवळपास झाल्यासारखंच आहे. त्यामुळे प्रेक्षक हे चित्रपटाच्या टायटल आणि टीझरची प्रतिक्षा करत आहे. प्री-प्रोडक्शनचं काम शेवटच्या फेजमध्ये आहे. तर लोकेश आणि रजनीकांत पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत. ‘डीटी नेक्स्ट’ च्या नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार, मोहन, विजय सेतुपति आणि शाहरुख खान ‘थलाइवर 171’ च्या कास्टचा भाग आहेत. या चित्रपटाच्या कलाकारांविषयी बोलायचं झालं तर मोहन आणि विजय यांनी अगोदर एकत्र काम केलं आहे. तर असं म्हटलं जातं की रजनीकांत यांच्या या चित्रपटात मोहन हे खलनायकाच्या भूमिकेत दिसतील.

विजय सेतुपतिनं रजनीकांत यांच्यासोबत ‘पेट्टा’ साठी एकत्र स्क्रीन शेअर केली होती तर लोकेशच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या ‘मास्टर’ आणि ‘विक्रम’ या चित्रपटात देखील काम केलं आहे. तिन्ही चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारल्यानंतर तो आता ‘थलाइवर 171’ मध्ये तो एका चांगल्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर या चित्रपटात शाहरुख खानची महत्त्वाची भूमिका असणार आहे. या चित्रपटात त्याची पाहुण्या कलाकाराची भूमिका असणार आहे. आता ही बातमी समोर आल्यानंतर चाहते खूप उस्तुक झाले आहेत. आता प्रेक्षक हे २२ एप्रिलची प्रतिक्षा करत आहेत.

रजनीकांत यांच्या कामाविषयी बोलायचे झालं तर त्यांच्याकडे है वेट्टैयन या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट यंदाच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राणा दग्गुबती आणि अमिताभ बच्चन देखील आहे. तर दुसरीकडे रजनीकांत यांच्या ‘लाल सलाम’ चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर काही कमाल केली नाही.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button