अमित शहा यांचा महाविकास आघाडीवर घणाघात; ‘महाराष्ट्रात दोन नकली पक्ष’

नांदेड : महाराष्ट्रात दोन नकली पक्ष आहेत. एक आहे नकली शिवसेना, दुसरी आहे नकली राष्ट्रवादी आणि एक अर्धीमुर्धी काँग्रेस पार्टी. या तिघांची ऑटो आहे. मात्र यांचे काही खरे नाही, असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लगावला. महाराष्ट्राचा विकास हे तीन पक्ष करू शकत नाहीत, हे काम फक्त नरेंद्र मोदीच करू शकतात असा दावाही त्यांनी केला. नांदेड लोकसभेचे महायुतीचे भाजपातर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी गुरुवारी अमित शहा यांनी जाहीर सभा घेती. यावेळी अमित शहा यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. अमित शहा म्हणाले, वातावरण बिघडले आहे असे काँग्रेसवाल्यांना वाटते. मात्र नांदेडमध्ये भाजपचेचे वातावरण आहे. ही निवडणूक मोदींना पंतप्रधान करण्याची आहे. नांदेडकर प्रतापराव पाटील यांना जे मत देणार आहेत, ते मत मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी असणार आहे.
महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र आले आहेत. त्यात नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीचा समावेश आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना अर्धी झाली आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी अर्धी झाली आहे आणि या दोन्ही अर्ध्या पक्षांनी मिळून काँग्रेसलाही अर्धे केले आहे. त्यामुळे हे तिन्ही अर्धे पक्ष मिळून महाराष्ट्राचे भले करणार का? असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला.
तसेच, ही एक अशी ऑटो रिक्षा आहे, जिचे तीन पाय आहेत, पण गवर्नर अम्बेसिडरचे आहे, गिअरबॉक्स फियाटचे आहे, आणि उर्वरित इंजिन मर्सडीजचे आहे. या ऑटो रिक्षाला कोणतीच दिशा नाही. या रिक्षाचे भविष्य स्पष्ट आहे. निवडणुकीनंतर आपापसातील मतभेदामुळे हे लोक तुटणार आहेत. आमच्या गुजरातमध्ये एक म्हण आहे, तीन तिघाडा, काम बिघाडा, असेच या मविआचे होणार आहे. तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात काश्मीर प्रश्नाचा आणि महाराष्ट्र, राजस्थानचा काही संबंध नाही. तुम्हीच सांगा कलम ३७० हटायला हवे होते की नाही? यावर उपस्थितांना होकार दिला. त्यानंतर अमित शहास म्हणाले एखाद्या अनौरस बाळासारखं काँग्रेसने कलम ३७० सांभाळले. मोदींनी कलम ३७० रद्द केले आणि काश्मीर भारताशी जोडण्याचे काम केले.