महाराष्ट्र

भारताच्या विकासगाथेला एशियन डेव्हलपमेंट बँकेची दाद !

मुंबई : भारताच्या विकासगाथेला एशियन डेव्हलपमेंट बँकेची मान्यता मिळाली आहे. बँकेने भारताच्या अपेक्षित ६.७ टक्क्यांच्या तुलनेत ७ टक्के जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादन) राहील असे अनुमान मांडले आहे. एडीबी (Asian Development Bank) भारतातील खाजगी व पब्लिक सेक्टरमधील होत असलेल्या मोठ्या वाढीला दाद देत पुढील भाकीत केले आहे.

गेल्या काही महिन्यांत भारताच्या ग्राहकांच्या मागणीत व गुंतवणूकीत झालेल्या वाढीमुळे हा दर वाढलेला राहणार असल्याचे अनुमान बँकेने नोंदवले आहे. बँकेने आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील दर ७.६ टक्यांच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये घटत ७ टक्के राहणार असल्याचं बँकेने म्हटले आहे. डिसेंबर २०२३ मध्ये एशियन डेव्हलपमेंट बँकेने भारताची अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत ६.७ टक्के राहील असे अनुमान व्यक्त केले होते. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये उत्पादनातील मोठी वाढ व उत्पादनातील मागणीत वाढ यामुळे या दरात वाढ झाल्याचे म्हटले होते. यात वाढ कायम राहणार असल्याचे बँकेने म्हटले आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये मागणीचा वेग मंदावला तरी उत्पादनातील मागणी वाढणार असल्याचे बँकेने सुतोवाच केले आहे.

विकसित राष्ट्रातील अर्थव्यवस्थेत गती मंदावली असल्याने निर्यातीत घट झाली होती आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत निर्यातीत वाढ होण्याची शक्यता बँकेने नोंदवली आहे. चलनवाढीचा दर कमी झाल्यामुळे आर्थिक धोरण हे विकासाला सहाय्यक राहण्याची अपेक्षा आहे, तर राजकोषीय धोरण एकत्रीकरणाचे उद्दिष्ट ठेवते परंतु भांडवली गुंतवणुकीसाठी समर्थन कायम ठेवते. खर्च शिल्लक ठेवल्यास, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये सात टक्क्यांपर्यंत वाढीचा अंदाज आहे परंतु २०२५ मध्ये ती ७.२ टक्क्यांपर्यंत सुधारेल, “एडीबीने सांगितले.

मध्यम कालावधीत निर्यातीला चालना देण्यासाठी, बँकेने म्हटले आहे की भारताला जागतिक मूल्य साखळींमध्ये अधिक एकत्रीकरणाची आवश्यकता आहे. गेल्या आठवड्यात, आरबीआयने मध्यम चलनवाढीचा दबाव, सामान्य मान्सून आणि उत्पादन आणि सेवांमध्ये निरंतर गती या अपेक्षेनुसार FY25 साठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज ७% वर वर्तवला होता. एशियन बँकेने चीन व्यतिरिक्त इतर विकसनशील आशियाई देशांत दोन वर्षांत मोठी वाढ होऊ शकते असे म्हटले आहे. ग्राहकांच्या मागणीत वाढ व महागाई घटल्याने ही वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे.या क्षेत्रात अर्थव्यवस्था ४.९ टक्क्यांनी वाढणार असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. मात्र रियल इस्टेटमधील घट व देशांतर्गत मागणीत घट झाल्याने चीनच्या प्रगतीत मंदी जाणवू शकते असा कयास बँकेने नोंदवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button