देशविदेशभारत

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एनडीएच्या एकूण ७१ खासदारांनी घेतली शपथ

वृत्तसंस्था ; नरेंद्र मोदींनी रविवारी संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह एनडीएच्या एकूण ७१ खासदारांनी पहिल्या शपथविधी सोहळ्यामध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे मंत्र्यांच्या संख्येवर सध्या मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. मंत्र्यांची एकूण संख्या, त्यातील पक्षनिहाय मंत्रीपदांचं वाटप, भाजपा-जदयू-टीडीपीमध्ये झालेलं बहुतेक मंत्रीपदांचं वाटप या मुद्द्यांवर आता चर्चा होऊ लागली आहे. रविवारी झालेल्या शपथविधीमध्ये मोदींव्यतिरिक्त शपथ घेतलेल्या एकूण ७० मंत्र्यांपैकी ६० मंत्री एकट्या भाजपाचेच आहेत.

लोकसभा निवडणुकांनंतर मोदी सरकारच्या मंत्रीमंडळाची जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. यंदा एनडीएला बहुमत मिळालं असलं, तरी भाजपाला स्वबळावर सत्ता स्थापन करण्याइतकं संख्याबळ जुळवता आलं नव्हतं. त्यामुळे मित्रपक्षांच्या पाठिंब्यावरच पुढची ५ वर्षं मोदी सरकारचा कारभार चालणार आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये कोणत्या पक्षाला किती महत्त्व दिलं जातं, यावर तर्क-वितर्क लावले जात होते. यासंदर्भात आता पहिल्या शपथविधीतील मंत्र्यांची सविस्तर यादी समोर आली असून त्यातून हे गणित स्पष्ट झालं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button