गुन्हे

विरार हादरलं! विवाहबाह्य संबंधातून महिलेची गळा दाबून हत्या; प्रियकरावर गुन्हा दाखल

विरार : विरारमध्ये एका खळबळजनक हत्येची  घटना उघडकीस आली आहे. यात एका विवाहित महिलेची साडीने गळा आवळून हत्या केल्याच उघडकीस आली आहे. याप्रकरणी मध्यरात्री विरार पोलिसांनी महिलेच्या प्रियकाराविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. दोघांमधील किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट हत्येपर्यंत गेल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास विरार शहर पोलीस करत आहे.

धनश्री आंबडस्कर (वय ३२ वर्ष ) ही महिला रुपेश आंबडस्कर (वय ३७ वर्ष ) तसेच नेत्रा आणि नव्या या दोन लहान मुलींसह विरार पश्चिमेच्या फुलपाडा येथील साईनाथ अपार्टमेंटमध्ये राहत होती. सोमवारी सकाळी तिचा पती रूपेश कामावर गेला होता, तसेच दोन मुली शाळेत गेल्या होत्या. दरम्यान दुपारच्या सुमारास या प्रकरणातील संशयित आरोपी धनश्रीचा मानलेला भाऊ शेखर कदम हा धनश्रीच्या घरी आला होता. लोकांना सांगण्यासाठी भाऊ पण खरंतर शेखर धनश्रीचा प्रियकर होता. मागील ५-६ वर्षांपासून धनश्री आणि शेखरचं विवाहबाह्य संबंध होते.  धनश्रीला शेखरसोबत लग्न करायचं होतं. यावरून दोघात वारंवार खटके उडायचे. काही कारणास्तव त्या दोघामध्ये भांडण झालं, शेखर संतापला अन् रागाच्या भरात त्याने आपल्याच प्रेयसीचा, धनश्रीचा गळा आवळला. धनश्री तडफडू लागली, जीव वाचवण्यासाठी धडपडू लागली. मात्र शेखर काही थांबला नाही. साडीने गळा आवळून शेखरने धनश्रीचा जीव घेतला. त्यानंतर त्याने धनश्रीची तब्येत बिघडल्याचा बनाव रचला आणि धनश्रीची प्रकृती खालावल्याचं सांगत तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तिथं डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केलं. धनश्रीचा पती रुपेशला फोन करून तसं कळवण्यात आलं. त्याच्यातर पायाखालची जमीनच सरकली.

या घटनेचा पोलिसांनी सखोल तपास सुरू केला त्यावेळी शेखरचा बनाव उघड झाला. पोलिसांनी खाक्या दाखवताच शेखर बोलता झाला.  शेखर पेशानं रिक्षाचालक आहे. तोदेखील विवाहित असून त्याला एक मुलगी आहे. गेल्या पाच-सहा वर्षांसून शेखर आणि धनश्री एकमेकांच्या संपर्कात होते. धनश्रीला शेखरसोबत संसार थाटायचा होता. मात्र शेखरचा लग्नासाठी साफ नकार होता आणि शेवटी त्यानेच धनश्रीचा शेवट केला. धनश्रीच्या घरच्यांनी अनेकदा धनश्री आणि शेखरला समज दिली होती. मात्र दोघांनी कुणाचं एकलं नाही. या घटनेनं आज दोन कुटुंबीय उद्ध्वस्त झाली आहेत. दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा अशा पद्धतीने द एन्ड झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button