T20 विश्वचषक ट्रॉफीसह टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी रवाना!

भारताचा विश्वविजेता क्रिकेट संघ बार्बाडोसवरून दिल्लीला पोहोचला आहे. भारतीय संघाने दिल्लीला विमानतळावर पोहोचताच चाहत्यांनी त्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. यावेळी सकाळी भारतीय संघ दिल्लीला उशिरा पोहोचल्यामुळे त्याने फार कमी वेळ मिळाला आराम करण्यासाठी. त्यामुळे भारताचा संघ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर भारताचा संघ मुंबईसाठी रवाना होणार आहे. बीसीसीआयने वानखेडे स्टेडियम येथे मरीन ड्राइव्हला रोड शो चे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संघासोबत बीसीसीआयचे सचिन जय शाह सुद्धा नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा संघ विजयी झाल्यानंतर कॉलद्व्यारे यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा देऊन अभिनंदन केले होते. आज भारताचा संघ प्रत्यक्षात विश्वविजेता झाल्यानंतर मोदींना भेटणार आहे. T20 विश्वचषक ट्रॉफीसह टीम इंडियाचे दुसरे T20I विजेतेपद जिंकल्यानंतर आज सकाळी दिल्ली विमानतळावर आगमन झाल्यानंतर भारतीय संघ मोदींना भेटण्यासाठी रवाना झाला आहे. काही वेळातच भारताचा संघ नरेंद्र मोदींना भेटणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय क्रिकेट खेळाडूंच्या भेटीचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे. हे प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर दाखवण्यात येणार आहे.
भारताचा संघ विजयी झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईमध्ये येणार आहे. यासाठी बीसीसीआयने मुंबई येथे वानखेडे स्टेडियम येथील मरीन ड्राइव्हवर रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आता भारताचे क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता वेगळ्या स्तरावर आहे. भारताने २००७ मध्ये वर्ल्डकप जिंकल्यानंतर मुंबईमध्ये रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारताचे लाखो चाहते या आनंदात सामील झाले होते. मुंबईमध्ये आज सकाळपासून भारतीय क्रिकेट चाहत्यांनी टीम इंडियाचे स्वागत करण्यासाठी गर्दी केली आहे.