अनिल कपूर होस्ट केलेला ‘बिग बॉस OTT 3’ प्रेक्षकांनी सर्वाधिक पाहिलेला शो
अनिल कपूर-होस्ट केलेला रिॲलिटी शो ‘बिग बॉस OTT 3’ OTT वर स्ट्रिमिंग सुरू झाल्यापासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तब्बल ८.८ दशलक्ष व्ह्यूजसह रिॲलिटी शोने गेल्या आठवड्यातील भारतीय स्ट्रीमिंग स्पेसमधील सर्वाधिक पाहिलेल्या शो आणि चित्रपटांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. शोला मिळालेला प्रतिसाद हा अनिल कपूरच्या स्टार पॉवरची केवळ एक परिपूर्ण झलकच नाही तर त्याने साकारलेली प्रत्येक भूमिका खास ठरली आहे.
अलीकडेच अनिल कपूर यांनी बहुप्रतिक्षित वीकेंड का वार आयोजित केला होता आणि त्याने प्रेक्षकांना जे अपेक्षित होते तेच दिले. स्पर्धकांचा एक अनफिल्टर फीडबॅक मोठ्या पडद्यावर विविध भूमिकांद्वारे आपली अष्टपैलुत्व दाखवणारा हा अभिनेता निश्चितपणे ‘बिग बॉस ओटीटी ३’ होस्ट करण्यासाठी स्वतःला योग्य असल्याचे सिद्ध करत आहे. बिग बॉस OTT 3 चा प्रोमो मध्ये अनिल कपूर ला पाहून काही प्रेक्षक नाराज झालेले नजर आले होते परंतु आता त्यांनासुद्धा अनिल कपूरला हा शो होस्ट करताना पाहून आनंद झाला आहे.
बिग बॉस OTT 3 मधील स्पर्धक आणि हा शो आताच्या घडीला खूप मज्जेशीर आणि प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा आहे. त्यात या झक्कास अभिनेत्याची भर पडल्यामुळे या शो मध्ये अनिल कपूर ला पाहण्याची आतुरता प्रेक्षकांना लागलेली असते. बिग बॉस च्या चाहत्यांना हा शो प्रचंड आवडला अजून हा शो OTT प्लॅटफॉमवर सर्वाधिक पाहिलेल्या शो मधील पहिला ठरला आहे.
थिएटरच्या आघाडीवर अनिल कपूरने अलीकडेच ‘ॲनिमल’, ‘फाइटर’ आणि ‘क्रू’ या त्याच्या निर्मिती उपक्रमासह सलग हिट चित्रपट दिले. आता तसेच अनिल कपूर सुरेश त्रिवेणींच्या ‘सुभेदार’ या चित्रपटात काम करण्याच्या तयारीत आहे. या पलीकडे, अभिनेता YRF स्पाय युनिव्हर्समध्ये पाऊल ठेवत असल्याची चर्चा होत आहे.