गुन्हे

शिक्षण उपसंचालकासह पत्नीवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल; एसीबीकडून बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी कारवाई

पुणे : तत्कालीन शिक्षण उपसंचालक आणि सध्याचे नंदुरबारचे माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रवीण अहिरे यांच्यावर एसीबीकडून बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. ज्ञात स्रोता पेक्षा ३१ लाख ७८ हजार २०० रुपयांची (२५.२६ टक्के) मालमत्ता त्यांनी गैर मार्गाने कमावली असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. यानंतर त्यांच्यासह पत्नीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात प्रवीण अहिरे व पत्नी स्मिता प्रवीण अहिरे (रा. नाशिक) यांच्यावर बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प्रवीण अहिरे काही वर्षांपूर्वी पुण्यात शिक्षण उपसंचालक होते. दरम्यान पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत १८ मार्च २००२ ते १० फेब्रुवारी २०२० या कालावधीतील उघड चौकशी सुरू केली होती. त्यांनी कायदेशीर स्त्रोताद्वारे मालमत्ता संपादित केली की नाही, याची चौकशी करण्यात आली.

उघड चौकशीत त्यांना एसीबीने वेळोवेळी मालमत्तेबाबत माहिती देण्याची संधी दिली होती. लोकसेवक पद धारण केल्याच्या कालावधीत कायदेशीर उत्पन्नापेक्षा त्यांनी ३१ लाख ७८ हजार २०० रुपयांची मालमत्ता ही (२५.२६ टक्के) अपसंपदा (बेहिशोबी मालमत्ता) भ्रष्ट मार्गाने जमवली असल्याचे उघडकीस आले. ही मालमत्ता त्यांच्या व पत्नी स्मिता यांच्या नावावर असल्याचेही चौकशीतून समोर आले आहे. पत्नी स्मिता यांनी प्रवीण अहिरे यांना सहाय्य केले. तसेच गुन्ह्यास प्रोत्साहित करून अपप्रेरना दिल्याने दोघांवर बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा नोंद केल्याचे सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button