जीवनशैली

ओले कपडे सुकवण्याच्या ‘या’ सर्वात सोप्या पद्धती घ्या जाणून

पावसाळा ऋतू अखेर सुरु झाला आहे. पावसाळा सुरु झाला की रोगराई आणि यासोबतच कपडे न सुकण्याची समस्या वाढत जाते. पावसाळ्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असते आणि त्यामुळे नीट सूर्यप्रकाश मिळत नाही. या ऋतूत आद्रतेचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे आपले ओले कपडे सुकत नाहीत. काही वेळा तर संपूर्ण दिवस संपतो तरी आदल्या दिवशीचे कपडे काही सुकत नाहीत. ही समस्या अनेकांना सतावत असते. पावसाळ्यातील ही एक सामान्य समस्या आहे. मात्र आता तुम्ही या समस्येला दूर करू शकता.

एवढेच काय तर या ऋतूत कपडे जेव्हा सूर्यप्रकाशाशिवाय जातात तेव्हा त्यांना कुबट वास येऊ लागतो. तुम्हालाही पावसाळ्यात लवकर कपडे सुकवायचे असतील तर तुम्ही काही घरगुती ट्रिक्स फॉलो करू शकता. आज आम्ही तुम्हाला कपडे सुकवण्याच्या काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्सचा वापर करून तुम्ही अवघ्या काही मिनिटांचं तुमचे कपडे कडकडीत सुकवू शकता.

सूर्यप्रकाशाशिवाय काही मिनिटांत ओले कपडे सुकवण्याचा हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. जर तुम्ही ओल्या कपड्यांना गरम इस्त्रोने दाबले तर पाण्याचे बाष्पीभवन होईल आणि तुमचे कपडे कोरडे होतील. मात्र यापूर्वी तुमचे कपडे नीट धुवून, पिळून घ्या मग ही प्रक्रिया करा. तुम्ही वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये कपडे हलके सुकवल्यानंतरही ही प्रक्रिया करू शकता.

ओव्हनचा करा वापर : तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, तुम्ही तुमचे ओले कपडे ओव्हनमध्येही कोरडे करू शकता. तथापि, केवळ लहान कपड्यांसाठी मायक्रोवेव्ह ओव्हन वापरणे अधिक प्रभावी आहे. जसे की, अंडरवेअर, मोजे आणि रुमाल, या गोष्टी तुम्ही ओव्हनमध्ये टाकून हिट करून सुकवू शकता. ओव्हनमध्ये कपडे सुकविण्यासाठी, कपड्यांमधील पाणी पिळून घ्या आणि आपले कपडे बेकिंग शीटवर ठेवा. मग ही शीत ओव्हनमध्ये टाका. मात्र यांना जास्त काळ ओव्हनमध्ये ठेवू नका अन्यथा तुमचे कपडे खराब होऊ शकतात.

हेअर ड्रायरचा करा वापर : तुम्ही कपडे सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचाही वापर करू शकता. कपडे सुकवण्यासाठी हा एक क्विक प्रभावी पर्याय आहे. यासाठी तुमचा हेअर ड्रायर हिट मोडवर लावा आणि नंतर याच्या मदतीने कपडे सुकवा. हेअर ड्रायरमधून बाहेर पडणारी गरम हवा ओले कपडे सुकविण्यासाठी प्रभावी ठरू शकते. तसेच यामुळे कपड्यांमधील वास दूर होतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button