पुण्यातील खळबळजनक प्रकार; महिला पोलीस शिपायाचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न

पुणे : चारित्र्यावर संशय घेऊन पोलीस शिपाई असलेल्या विवाहितेच्या पतीने तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हर्षद विकास पानसरे (वय ३६, रा. विश्रांतवाडी पोलीस वसाहत, विश्रांतवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत ३४ वर्षीय महिला पोलीस शिपाई यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, पोलिसांनी गुन्हा नोंद करून हर्षद याला अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार पुणे पोलीस दलात पोलीस शिपाई आहेत. त्या येरवडा पोलीस ठाण्यात नेमणूकीस देखील आहेत. त्या पती हर्षद यांच्यासह येरवडा भागातील पोलीस लाईन येथे राहण्यास आहेत. दरम्यान, पती त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत आहे. त्यावरून त्यांना त्रास देत होता. त्यामुळे त्यांचे अधून-मधून वाद देखील होत होते. दरम्यान, शनिवारी (२७ जुलै) हर्षद आणि तक्रारदार यांच्यात पुन्हा वाद झाला. बदनामीकारक मॅसेज तसेच शिवीगाळही केली. त्यांच्यात वाद झाल्यानंतर गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर सोशल मिडीयात बदनामीकारक मॅसेज पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रवींद्रकुमार शेळके अधिक तपास करत आहेत.