मनु भाकर; पॅरिस आलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला

वृत्तसंस्था : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनु भाकरने भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे. त्यानंतर आता देशामध्ये तिची मोठ्या प्रमाणात वाहवाह केली जात आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मागील तीन ऑलिंपिकपासून भारतीय महिलांनी इंडियाला पाहिले पदक मिळवून दिले आहे. यामध्ये रिओ ऑलिम्पिक भारताची स्टार कुस्तीपटू साक्षी मलिकने भारताला पदक मिळवून दिले, त्यानंतर टोकियोमध्ये भारताला मीराबाई चानूने पदक मिळवून इतिहास रचला होता. पदक जिंकल्यानंतर आता सगळेच तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. परंतु याआधी सुद्धा मनु भाकरने आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी केलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिच्या पिस्तूलने तिच्यासोबत धोका केला होता आणि ती पदकापासून दूर राहिली.
पॅरिस ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती मनु भाकर हीचा ही दुसरी ऑलिम्पिक स्पर्धा आहे. पहिले ती टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली होती आणि या स्पर्धामध्ये तिच्या पिस्तूलने साथ सोडली आणि तिच्या खेळीवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. मनूला टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरी गाठता आली नव्हती. पात्रता फेरीदरम्यान त्याच्या पिस्तूलमध्ये बिघाड झाल्याचे उघड झाले. शेवटच्या क्षणी त्याच्या पिस्तुलाने दगा दिला होता. मनू पात्रता फेरीत ५७५ गुणांसह १२वी राहिली. पिस्तुलमध्ये बिघाड झाल्यामुळे मनूला पाच मिनिटे थांबावे लागले होते.
मनूचे वडील रामकिशन भाकर आणि नॅशनल रायफल असोसिएशनच्या अधिकाऱ्यानेही मनूच्या पिस्तूलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे मान्य केले होते. तेव्हा मनूने पात्रता फेरीत ९८ गुण मिळवले होते. दुसऱ्या फेरीत त्याचे पिस्तूल खराब झाले. यानंतर ती टार्गेट सोडून बाहेर आली आणि सुमारे पाच मिनिटांनी तिची पिस्तुल फिक्स झाली. त्यानंतर ती दुसऱ्या फेरीत ९५, तिसऱ्या फेरीत ९४, चौथ्या फेरीत ९५, पाचव्या फेरीत ९८ आणि सहाव्या फेरीत ९५ धावा केल्या. ती अंतिम फेरी गाठण्यात दोन गुणांनी कमी होती. यानंतर मनू रडताना दिसली. ती भावूक झाली.