
वृत्तसंस्था : २०२३ च्या बॅचच्या प्रशिक्षणार्छी आयएएस अधिकारी पूजी खेडकर अचानक चर्चेच आल्या. त्यांना परीविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी अधिकारी म्हणून गृहजिल्हा असलेल्या पुण्यात नियुक्ती मिळाली. पूजा खेडकर यांनी प्रबोशनमध्ये असताना विशेष अधिकारांची मागणी केली. त्यांना त्यांच्या गाडीवर लाल दिवा, व्हीआयपी नंबर प्लेट असलेल्या खासगी ऑडी कारवर महाराष्ट्र सरकारचा बोर्ड हवा होता. कामापेक्षा अधिकारवाणी गाजवणाऱ्या पूजा खेडकर चर्चेत आल्या. मात्र आता प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर हिला UPSC ने नोकरीतून काढून टाकले आहे. सध्या ती प्रोबेशनवर होती, मात्र कायमस्वरूपी नियुक्तीपूर्वीच तिला हाकलून देण्यात आले.
वादांच्या भोवऱ्यात सापडलेल्या पूजा खेडकरवर बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवल्याचा आरोप होता. पूजा खेडकर 2022 ची UPSC परीक्षा उत्तीर्ण झाली होती आणि सध्या ती महाराष्ट्रात ट्रेनी IAS म्हणून तैनात होती. पहिल्याच पोस्टिंगमध्ये त्यांनी अनेक सरकारी मागण्या केल्या होत्या. यावरून वाद वाढत असताना त्यांची पुण्याहून वाशीम येथे बदली करण्यात आली. एवढेच नाही तर नॉन क्रिमी लेयर ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी चुकीची कागदपत्रे दिल्याचे नंतर समोर आले.
एवढेच नाही तर त्यांनी आपल्या आई-वडिलांची नावेही बदलली होती. ओबीसींना आरक्षणाचा लाभ मिळावा आणि त्यांना यूपीएससी परीक्षेत बसण्याची अतिरिक्त संधी मिळावी म्हणून हे करण्यात आले. जेव्हा हे प्रकरण खुलात गेले तेव्हा यूपीएससीने त्यांच्याविरुद्ध एफआयआरही दाखल केला. याशिवाय पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याशिवाय ओळख लपवून परीक्षेला बसण्याची संधी मिळवून दिल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरण्यात आले. नोटिशीला उत्तर देण्यासाठी पूजा खेडकर यांच्याकडे २५ जुलैपर्यंत वेळ होती, मात्र त्यांनी ४ ऑगस्टपर्यंत वेळ मागितली होती. यादरम्यान मी आवश्यक कागदपत्रे गोळा करेन, असे त्या म्हणाल्या.
पूजाच्या आवाहनावर UPSC ने त्यांना ३० जुलैला दुपारी ३:३० पर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ दिला होता. या वेळेपर्यंत उत्तर न मिळाल्याने यूपीएससीने त्यांना सेवेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर आता ती यूपीएससीच्या कोणत्याही परीक्षेत सहभागी होऊ शकणार नाही.
या संदर्भात यूपीएससीने त्यांना आधीच सांगितले होते की, निर्धारित वेळेत उत्तर न मिळाल्यास कारवाई केली जाईल आणि नंतर त्यांच्या कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही. CSE-२०२२ परीक्षेच्या मानकांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पूजा खेडकर दोषी आढळल्याचे लोकसेवा आयोगाने म्हटले आहे. पूजाने नियमांच्या पलीकडे जाऊन चुकीच्या कागदपत्रांद्वारे अतिरिक्त संधी मिळवली. आता UPSC ने पूजा खेडकरला भविष्यात कोणत्याही परीक्षेला बसण्यास बंदी घातली आहे.