राज्याचे नवे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्यपाल पदाची घेतली शपथ

मुंबई : झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल पदाची शपथ घेतली. राधाकृष्णन हे रमेश बैस यांची जागा घेतील, जे १८ फेब्रुवारी २०२३ पासून राज्यपाल आहेत. झारखंडमध्ये सीपी राधाकृष्णन यांच्या जागी भाजपचे ज्येष्ठ नेते संतोष कुमार गंगवार यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाने शनिवारी रात्री अनेक राज्यांच्या राज्यपालांच्या नियुक्त्यांची घोषणा केली. दरम्यान सी पी राधाक्रुष्णन राज्याचे नवे राज्यपाल बनले आहेत. नवनियुक्त राज्यापालांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयचे मुख्य न्याय मूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी शपथ दिली.
सीपी राधाकृष्णन हे दीर्घकाळ भाजपचे सदस्य होते. तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले. ते तामिळनाडूमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. सी.पी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राधाकृष्णन हे विद्यमान राज्यपाल रमेश बैस यांची जागा घेतील. राधाकृष्णन हे सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. त्याचवेळी महाराष्ट्राचे माजी विधानसभा अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानचे राज्यपाल करण्यात आले आहे.
झारखंडचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील राज्यपालांच्या बदल्या आणि नियुक्त्यांबाबत काल रात्री उशिरा पहाटे एकच्या सुमारास परिपत्रक जारी करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विविध राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्तीला मान्यता दिली. सी.पी राधाकृष्णन यांची नियुक्ती अशा वेळी झाली आहे जेव्हा राज्यात या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. रमेश बैस हे १८ फेब्रुवारी २०२३ पासून महाराष्ट्राचे राज्यपाल होते.
६७ वर्षीय सी.पी. राधाकृष्णन हे मूळचे तामिळनाडूचे आहेत. त्यांचा जन्म ४ मे १९५७ रोजी तिरुपूर येथे झाला. वयाच्या १६व्या वर्षापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) जोडले गेले आहेत. राधाकृष्णन हे कोईम्बतूर मतदारसंघातून दोनदा लोकसभेवर निवडून गेले होते. ते भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. २००४ ते २००७ पर्यंत त्यांनी तामिळनाडूची कमान सांभाळली.
राधाकृष्णन हे प्रदीर्घ काळ भाजपचे सदस्य होते. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीतही भाजपने त्यांना उमेदवारी दिली, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी ते झारखंडचे राज्यपाल झाले.