गुन्हे

डोंबिवली हादरलं, रस्त्यावर अल्पवयीन मुली दिसताच त्यानं केलं भयंकर कृत्य!

डोंबिवली :ल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्याचं एक धक्कादायक प्रकरण बदलापूरमध्ये उघड झालं आहे. बदलापूरच्या घटनेनं संपूर्ण राज्यात संतापचं वातावरण आहे. बदलापूरप्रमाणेच राज्यातील अन्य भागाताही या प्रकराच्या घटना उघडकीस येत आहेत. सांस्कृतिक नगरी मानल्या जाणाऱ्या डोंबिवलीतही १२ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणातील आरोपीला तब्बल १४ दिवसांनी अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

डोंबिवली पूर्वेतील सागाव परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दोन अल्पवयीन मुली आपल्या घरातील इमारती जवळ उभ्या असताना रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका रिक्षामध्ये एक तरुण बसला होता. या दोन अल्पवयीन मुलींना बघून त्याने अश्लील हाव भाव सुरू केले. त्यांनी आपली पॅन्ट खाली करून मुलींना बघून अश्लील हाव भाव करीत असताना एका महिलेने देखील पाहिले. तरुणाचे हे कृत्य बघून अल्पवयीन मुलींनी आरडाओरडा सुरू केला. मुलींच्या आरडाओरडा सुरू झाल्यानंतर प्रवीण पाटील नावाचा हा तरुण तिथून पळून गेला. घडलेला प्रकार अल्पवयीन मुलींनी आपल्या नातेवाईकांना सांगितला .या प्रकरणात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्रवीण पाटील यांच्या शोधण्यासाठी मानपाडा पोलिसांनी दोन पथक तयार केली होती.

प्रवीण पाटीलच्या शोधात पोलीस अनेक ठिकाणी गेले. मात्र तो सापडला नाही. अखेर १४ दिवसानंतर त्याला मानपाडा पोलिसांनी नाशिक येथील सटाणा तालुक्यातून अटक केली आहे. त्याला शुक्रवार, २३ ऑगस्टला दुपारी मानपाडा पोलीस कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं. या प्रकरणाच्या पोलीस तपास करीत आहेत. मात्र या घटनेमुळे डोंबिवली एकच खळबळ उडाली आहे .बदलापूर अत्याचार घटनेनंतर अंबरनाथ शहरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली होती. आता डोंबिवलीत दोन अल्पवयीन मुलींसोबत घडलेला प्रकारानंतर प्रवीण पाटील या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button