गुन्हे

पारगाव पोलिसांची कारवाई; ऊसतोड मुकादामांना २५ लाखांचा गंडा घालणाऱ्यास बेड्या

मंचर : पारगाव ( ता. आंबेगाव) साखर कारखाना येथील स्थानिक मुकादमांकडून पैसे उकळून त्यांना मजूर व वाहनांचा पुरवठा करतो असे खोटे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चार वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला पारगाव पोलिसांनी अटक केली आहे. भीमा एकनाथ पवार असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून, त्याच्यावर पारगाव व मंचर पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. भीमा एकनाथ पवार याने ऊसतोड मुकादम यांना ऊस तोडणी व वाहतूक करण्यासाठी मजूर पुरवठा करतो. असा लेखी करारनामा करून तक्रारदार यांच्याकडून १४ लाख ४० हजार रुपये घेऊन मजूर व वाहनांचा पुरवठा करतो असे खोटे सांगून मजूर व वाहनांचा पुरवठा न करता फसवणूक केली होती. याबाबत सुरेश रखमा रोहिले व त्यांचा भाऊ नबाजी रोहिले (रा. कवठे येमई ता. शिरुर) यांनी दिनांक १/०६/२०२३ रोजी पारगाव कारखाना पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केल्यानंतर भीमा एकनाथ पवार (वय ४९ वर्षे रा. ओढरे ता. चाळीसगाव जि. जळगाव) याच्यावरती पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी पारगाव पोलीसांचे पथक दोन वेळा गेले असता सदर आरोपी हा पोलिसांची चाहुल लागताच पसार होत होता.

सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना सदर आरोपी हा त्याच्या गावी आला असल्याची माहिती गोपनीय बातमीदारा मार्फत पारगाव पोलिसांना समजली. पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलीस हवालदार नरेंद्र गोराणे व पोलिस अंमलदार चंद्रकांत गव्हाणे व पथकाने सापळा रचून आरोपीस ओढरे (ता. चाळीसगाव) येथून आरोपीला ताब्यात घेत अटक केली आहे. अटक आरोपीने अजूनही काही शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले असून, अजूनही कुठल्या शेतकऱ्याची फसवणूक झाली असेल तर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांनी केले आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, पोलीस निरीक्षक उमेश तावसकर (सायबर विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे पारगाव कारखाना पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके. भाऊसाहेब लोकरे, पोलीस हवालदार नरेंद्र गोराणे, पोलीस हवालदार देवानंद किर्वे, शांताराम सांगडे, पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत गव्हाणे, पोलीस कॉन्स्टेबल संजय साळवे, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश अभंग यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button