गुन्हे

अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ; शिक्षकाला मारहाण करत काढली धिंड

विरार : कोचिंग क्लासेस मध्ये शिकणार्‍या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या प्रमोद मोर्या या शिक्षकाला नागरिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केली. बुधवार सकाळी विरार पूर्वेच्या मनवेलापाडा येथे ही घटना घडली. संतप्त नागरिकांनी केलेल्या मारहाणीत हा आरोपी शिक्षक गंभीर जखमी झाला आहे. विरार पूर्वेच्या मनवेल पाडा येथील सह्याद्री नगरमध्ये प्रमोद मोर्या हा एक खाजगी कोचिंग क्लास चालवतो. यामध्ये सातवीत शिकणार्‍या १३ वर्षीय मुलीचा मागील आठवड्यात शिक्षक लैंगिक छळ करत होता. त्यामुळे ती घाबरून दोन दिवस क्लासला गेली नव्हती. ती क्लासला का जात नाही म्हणून तिच्या पालकांनी तिला विचारणा केली तेव्हा तिने हा प्रकार सांगितला. त्यामुळे तिचे पालक आणि परिसरातील संतप्त नागरिक क्लास मध्ये गेले आणि शिक्षक प्रमोद मोर्या याला बेदम चोप देत भर रस्त्यात धींड काढली. या मारहाणीत मोर्या रक्तबंबाळ झाला आहे.

या शिक्षकाने ३-४ मुलींचा यापूर्वी असाच लैंगिक छळ केला आहे. पण अन्य मुली घाबरतात याची चौकशी करा आणि आरोपीला कडक शिक्षा करा अशी मागणी आरती पडवळ या स्थानिक महिलेने केली आहे. हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. आम्ही मुलांना शिक्षकांकडे शिकविण्यासाठी विश्वासने पाठवतो परंतु ते असा घृणास्पद प्रकार करत आहे. हा नागरिकांच्या संतपाचा उद्रेक होता म्हणून त्याला बेदम मारहाण करत धिंड काढली, असे स्थानिक कार्यकर्ते मनिष राऊत यांनी सांगितले. नागरिकांनी आरोपीला आमच्या ताब्यात दिले आहे. त्याने मुलीची छेड काढून लैंगिक छळ केल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. तिचा जबाब नोंदवत असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button