वृत्तसंस्था : गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडले आहेत. मात्र तरीही नागरिक सोनं खरेदी करणे सोडत नाहीत. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना दागिन्यांनी सजण्याची आवड अधिक असते. मोत्या-माणिकांपेक्षा आपल्याकडे सोन्याचे दागिने घालण्याची परंपरा आहे. लग्नाआधी मुलीला सोन्याची चैन, कानातले, अंगठी, असे दागिने आई-वडिल हौशीने करतात. लग्नात नवरीला नवऱ्याकडून सोन्याचे मंगळसूत्र, अंगठी इत्यादी दागिने मिळतात. तर काही नातेवाईकमंडळीही आहेर म्हणून दागिने देतात. याचससंदर्भात सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. स्त्रीने ठेवलेल्या ‘स्त्रीधन’वर फक्त तिचाच अधिकार आहे. महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना म्हणजे आई किंवा वडीलही या दागिन्यांवर दावा करु शकत नाहीत. एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, लग्नादरम्यान मुलीला तिच्या पालकांनी दागिने दिले असले तरी ते तिच्याकडून परत घेता येणार नाहीत. त्या पैशावर फक्त मुलीचा हक्क आहे. तसेच महिलेचा घटस्फोट झाला तरी तिचे वडील स्त्रीधन परत मागू शकत नाहीत. हे पी. वीरभद्र राव नावाच्या व्यक्तीचे आहे, ज्याने १९९९ मध्ये आपल्या मुलीशी लग्न केले. यानंतर त्यांची मुलगी आणि जावई अमेरिकेला गेले.
लग्नाच्या १६ वर्षांनंतर मुलीने घटस्फोटाची केस दाखल केली होती. इतकेच नाही तर अमेरिकेच्या लुईस काउंटी सर्किट कोर्टाने फेब्रुवारी २०१६ मध्ये दोघांच्या परस्पर संमतीने घटस्फोट मंजूर केला होता. एका करारानुसार पती-पत्नीमध्ये घर आणि पैशाबाबत चर्चा झाली. यानंतर महिलेने २०१८ मध्ये दुसरे लग्न केले. तीन वर्षांनंतर महिलेच्या वडिलांनी तिच्या सासरच्यांविरोधात एफआयआर दाखल केला. त्याने मुलीच्या दागिन्यांची मागणी केली होती. या एफआयआरविरोधात मुलीच्या पहिल्या सासरच्यांनी तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु अर्ज फेटाळण्यात आला.
त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायमूर्ती जेके माहेश्वरी आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठाने मुलीच्या सासरच्या मंडळींना दिलासा दिला. न्यायालयाने म्हटले की, महिलेच्या वडिलांना आपल्या मुलीचे स्त्रीधन परत करण्याची मागणी करण्याचा अधिकार नाही. हा अधिकार फक्त स्त्रीलाच आहे ज्याला स्त्रीधन होते. येथे ‘स्त्रीधन’ म्हणजे दागिने आणि स्त्रियांशी संबंधित इतर वस्तू. न्यायमूर्ती संजय करोल यांनी आपल्या निर्णयात लिहिले आहे की, ‘हा एक सामान्य नियम आहे आणि कायद्याने हे देखील मान्य केले आहे की स्त्रीला तिच्या स्त्रीधनाचा पूर्ण अधिकार आहे. कोणीही ते शेअर करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय महत्त्वाचा असून भविष्यात अशा अनेक प्रकरणांमध्ये तो एक उदाहरण ठरू शकतो. स्त्रीधनावर पती किंवा माजी पतीचा अधिकार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. याशिवाय तिच्या वडिलांनाही कोणतेही अधिकार नाहीत, जोपर्यंत स्त्री जिवंत आहे आणि स्वत:बद्दल निर्णय घेण्यास सक्षम आहे.