राजकारण

विधानसभेसाठी अजित दादा इतक्या जागांवर लढवणार निवडणूक

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची अद्याप घोषणा झाली नसली तरी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याआधीच महायुतीमध्ये जागावाटपावरून खडाजंगी सुरू आहे. विधानसभेच्या अधिकाधिक जागांवर निवडणूक लढविण्याचा खल सुरू आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गट जनतेला आपल्याकडे आकर्षित करण्याच्या तयारीत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः जन सन्मान यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा दौरा करत आहेत.  या दौऱ्यात युवा अधिवेशनात बोलताना  अजित पवारांनी मोठे विधान केले आहे. निवडणुकीत राष्ट्रवादीला ६० च्या आसपास जागा मिळतील. आपला पक्ष ६० जागांवर निवडणूक लढवेल. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यासोबत त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना सूचनाही दिल्या आहेत.

आगामी विधानसभा निवडणूक अत्यंत गांभिर्याने घ्या हलगर्जीपणा करू नका. आपल्याला लोकसभेचं नॅरेटिव्ह बदलायचं आहे.  आपण शिव शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा सोडलेली नाही. महायुती म्हणून आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचे आहे. विधानसभेला जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या आहेत,  यावरच तुमचे माझे आणि पक्षाचं भवितव्य अवलंबून आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. ते युवा अधिवेशनात बोलत होते. यावेळी बोलताना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना काही सूचनाही दिल्या. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी  डोळ्यात तेल घालून काम करायला पाहिजे. कोणतेही व्यक्तव्य करण्याआधी सुनील तटकरे आणि माझ्याशी बोला. त्याशिवाय बोलू नका. आपल्याला विधानसभा मतदार संघात ‘अजिंक्य घड्याळ संवाद’ हा कार्यक्रम घ्यायचा आहे. काही झाले तरी नकारात्मक प्रचार होऊ देऊ नका.  विरोधक आरोप करतील,  सामाजिक विभागाचे पैसे काढले, आदिवासीचे पैसे काढले, असे म्हणतील पण असं काहीही झालेले नाही. त्याउलट आपण बेरोजगारी कमी करण्यासाठी काम करत आहोत. त्याठिकाणी भरती करत आहोत, असेही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितले.

जो कार्यकर्त्या चांगले काम करेल,त्याला जिल्हा पातळीवर बक्षील दिले जाईल, त्याला चांगल्या पदावर घेतले जाईल. जो पक्षाचे काम करेल त्याला मानसन्मान मिळेले. सोशल मीडियावरही आपला प्रचार कमी आहे, तोही वाढवायचा आहे. सोशल मीडियावर जो रोज एक लाख व्ह्यू पार करेल त्याला बक्षीस आणि सन्मान मिळेलं. त्यामुळे सोशल मीडियावर प्रचार वाढवा, असे आवाहनही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button