महाराष्ट्रराजकारण

राहुल गांधी संदर्भात वादग्रस्त विधाने करणाऱ्या ‘गायकवाड – बोंडें’वर गुन्हे दाखल करा; काँग्रेस ची मागणी

पुणे : काँग्रेसचे खासदार, विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधाने करत हिंसेला चिथावणी देणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्यावर उच्च न्यायालय आणि पोलिसांनी स्वत:हून कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या दगाबाजांना घेऊन सरकार स्थापन करूनही,  आनंदाचा शिधा – ओवाळणी देऊनही, राज्याची जनता ‘महायुतीला’ साथ देत नसल्याचे सर्वेक्षणातून पुढे आल्याने ‘राज्यातील सत्ताघारी’ मानसिक संतुलन बिघडल्या सारखे वागत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

आमदार संजय गायकवाड आणि खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी संदर्भात वादग्रस्त विधाने केली होती. त्याचे तीव्र पडसाद उमटत असून त्याविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर तिवारी यांनी ही मागणी केली. ते म्हणाले की, केवळ ‘विरोधीपक्ष संपुष्टात आणण्याच्या लालसेने’ अनैतिक आणि  असंवैधानिक मार्गाने सत्तेवर आलेले ‘महायुतीचे त्रिकुट सरकार’ वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्यांना सत्तेत सामील करून घेते आणि  भ्रष्टाचारास राजमान्यता देते,  हाच  छत्रपतींच्या महाराष्ट्राचा उपमर्द आहे. राज्याचे बेलगाम, घमेंडखोर आणि बेजबाबदार गृहमंत्री फडणवीस हेच जर विरोधकांना फोडून काढण्याची भाषा करत असतील. तसेच राज्यातील कायदा – सुव्यवस्था लयाला जाऊन दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असेल तर लोकशाहीचे दोन स्तंभ समजल्या जाणाऱ्या ‘प्रशासन व न्यायालय; या संस्थांनीच स्वत:हून कारवाई करुन कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button