गुन्हे

रेल्वे स्थानकात तिकीट निरीक्षकाला प्रवाशाकडून हॉकीस्टिकने मारहाण

वसई : नालासोपारा स्थानकात तिकीट निरीक्षकाला प्रवाशाकडून हॉकी स्टिकने मारहाण केल्याची घटना घडली आहे. विजयकुमार पंडित असे तिकीट निरीक्षकाचे नाव असून या मारहाणीत गंभीर जखमी झाला आहे. गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास विजयकुमार पंडित नालासोपारा रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या तिकीट तपासणीचे काम करीत होते. याच दरम्यान पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल मध्ये एक प्रवासी द्वितीय श्रेणीचे तिकीट घेऊन प्रथम श्रेणीच्या डब्ब्यातून प्रवास करताना आढळून आला.

त्या प्रवाशाला तिकीट अडविल्या नंतर त्याला ३४५ रुपये इतका दंड ठोठावला होता. त्याच्याकडे फक्त २१० रुपये असल्याचा दावा प्रवाशाने केला होता. त्यामुळे त्याला १५० रुपये इतका दंड आकारला होता. मात्र दंडाची पावती फाडल्यानंतर त्यांच्या बाचाबाची होऊन प्रवाशाने मागून हॉकीस्टिकने तिकीट निरीक्षकाला मारहाण केली. यात एक प्रहार त्यांच्या कानाजवळ झाल्याने पंडित हे जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात ओले. तर मारहाणीनंतर हल्लेखोर प्रवासी फरार झाला आहे. याप्रकरणी वसई रेल्वे पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या प्रवाशाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button