गुन्हे

महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या दलालावर कारवाई; चार महिलांची सुटका

नवी मुंबई : करंजाडे परिसरात महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत त्यावर गुजराण करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याच्या ताब्यातील तीन महिला आणि एक अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने केली आहे. राजू मंडल ऊर्फ वेजद अल्ली खान असे यातील आरोपीचे नाव आहे. तर शायना व अन्य एक आरोपी हे दोन्ही आरोपी महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेत त्यातील काही पैसे स्वत:कडे ठेवत होते. त्याच पैशातून गुजराण करीत होते. याबाबत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पृथ्वीराज घोरपडे यांना माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर बनावट ग्राहकांनी आरोपींशी संपर्क केला असता महिला पुरवणारा मध्यस्थ इसम राजु मंडल (वेजद अल्ली खान) हा ग्राहकांना वेश्यागमनासाठी १६ ते १७ वर्षाच्या मुली पुरवत होता. एका मुलीचे दहा हजार असे चार मुलीचे ४० हजार रुपये दर ठरवून मुली पसंत केल्यानंतर या मुलींना त्या ग्राहकांच्या ताब्यात देत होता. अनेकदा लॉज व हॉटेलमध्ये कागदपत्र मागत असल्याने ग्राहकांना हव्या त्या ठिकाणी सोडत असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारावर राजू याच्याशी बनावट ग्राहकाने व्यवहार केला. त्यानुसार आरोपींनी २२ तारखेला रात्री ९ वाजता कारंजाडे येथील एका बस थांब्यावर भेटायचे ठरविण्यात आले. आरोपी महिलांना घेऊन येताच बनावट ग्राहकाने पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच सापळा रचलेल्या पोलिसांनी झडप घालून आरोपीला पकडले. मात्र दुसरी महिला आरोपी आली नसल्याने तिचा आणि अन्य एकाच अशा दोन आरोपींचा शोध सुरू आहे. सह पिटा अ‍ॅक्ट ४, ५, सह पोस्को कायदा कलम ८, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पनवेल शहर पोलीस ठाणे करत आहे. आरोपींकडे एक अल्पवयीन मुलगी आढळून आली तसेच अन्य तीन महिलांची सुटका केली आहे. मात्र या चारही महिला बांगलादेशी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button