महाराष्ट्रराजकारण

महाराष्ट्र विधानसभा काबीज करण्यासाठी अमित शाहांची खास रणनीती; ‘मिशन मुंबई’

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकारणात हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय निवडणूकआयोगाचे एक पथक माहाराष्ट्रात दाखल झाले आहे. कोणत्याही क्षणी महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा होऊ शकते. त्यातच भाजपनेही आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी केल्याचे दिसत आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी नुकताच विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा केला. यानंतर ते पुन्हा मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. येत्या १ आणि २ ऑक्टोबरला ते मुंबई दौऱ्यावर येत आहेत.  मुंबई काबीज करण्यासाठी अमित शाहांनी मिशन मुंबईसाठी मोठं प्लॅनिंग केल्याची माहिती समोर आली आहे. अमित शाहांनी मुंबईसाठी खास रणनीती आखली आहे. लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर भाजपने विधानसभेसाठी कंबर कसली आहे.विशेष म्हणजे विदर्भ, मराठवाड्यानंतर खुद्द अमित शाहांनीच मुंबईसाठी खास प्लॅनिंग केलं आहे. त्यासाठी मुंबई दौऱ्यावर आल्यावर अमित शाह विभागनिहाय आढावा घेणार आहेत. यावेळी ते मुंबईतील डेंजरझोन मतदारसंघांचा  आढावा घेणार आहे.

या दौऱ्यादरम्यान अमित शाहांचा मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर  पुढच्या तीन दिवसांमध्ये मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्याचे आदेश भाजप पदाधिकाऱ्यांना आल्याची आले आहेत.  या तीन दिवसांत आढावा घेतलेल्या प्रत्येक मतदारसंघाचा अहवाल तयार केला जाणार आहे. त्यानंतर तो  अमित शाहांकडे सुपूर्द केला जाईल. या अहवालानुसार, ज्या मतदारसंघात संबंधित आमदाराची समाधानकारक कामगिरी नसेल, त्यांची धाकधूक मात्र वाढणार आहे. त्यामुळे अमित शाहा त्यांच्याबाद्दल काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, अमित शाहांनी त्यांच्या विदर्भ दौऱ्यादरम्यान, भाजपला ४५ जागांचं टार्गेट दिले आहे. लोकसभा निवडणुकीत विदर्भातच भाजपचा जवळपास सुपडा साफ झाला होता. त्यामुळे विधानसभेला अमित शाहांनी भाजपला थेट ४५ जागांचे टार्गेट दिले आहे.

दरम्यान, राज्यात केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक दाखल झाले आहे. कोणत्याही क्षणी राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात. आज आणि उद्या स्वत: निवडणूक आयुक्त राजीव कुमार, ग्यानेश कुमार आणि डॉ. सुखबीर सिंग संधू  राज्यातील निवडणुकीच्या तयारीच्या  अनुषंगाने आढावा घेणार आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन ते निवडणुकीची घोषणा करू शकतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button