
वृत्तसंस्था : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यात आता राजधानी दिल्लीत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांनी ५६०० कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटच्या तपासात असे दिसून आले की, ५६०० कोटी रुपयांच्या कोकेन शिपमेंटचा मास्टरमाईंड हा काँग्रेसशी संबंधित आहे. दिल्ली पोलिसांनी अमली पदार्थांची मोठा जप्त केला आहे. पोलिसांच्या स्पेशल सेलने सुमारे ५ हजार ६०० कोटींचे कोकेन जप्त केले आहे. दक्षिण दिल्लीत हा छापा टाकल्यानंतर ही जप्तीची कारवाई करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, स्पेशल सेलने ५६५ किलोहून अधिक कोकेन जप्त केले आहे. याप्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली आहे. या ड्रग्जची किंमत अंदाजे ५६०० कोटी रुपये आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलीस कसून चौकशी करत आहेत.
दिल्ली पोलिसांच्या तपासात ५००० कोटी रुपयांच्या कोकेनचा साठा समोर आला आहे. यातील मास्टरमाइंडचे काँग्रेस कनेक्शनही उघड झाले आहे. ड्रग कार्टेलचा मास्टरमाईंड आणि मुख्य आरोपी तुषार गोयल हा असल्याचे दिसत आहे. तो २०२२ पर्यंत दिल्ली प्रदेश काँग्रेसमध्ये आरटीआय सेलचा अध्यक्ष होता. अनेक काँग्रेस नेत्यांसोबत आरोपीचे चित्र समोर आले आहे. आरोपीने त्याच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर ‘आरटीआय सेल अध्यक्ष, दिल्ली प्रदेश काँग्रेस’, असेही लिहिले आहे. दिल्ली पोलिसांनी अमली पदार्थांची आजवरची सर्वात मोठी जप्तीची कारवाई केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ५६० किलोपेक्षा जास्त कोकेन आणि ४० किलो ‘हायड्रोपोनिक मारिजुआना’ जप्त करण्यात आले आहे, ज्याची अंदाजे किंमत ५६२० कोटी रुपये आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल टीमने दक्षिण दिल्लीतील महिपालपूर येथून चार जणांना पकडले आहे.