गुन्हे

बॉम्बस्फोटतील दोषी अबू सालेमला भेटण्यासाठी आले; अन् एटीएसच्या जाळ्यात फसले

नाशिक :  कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमची भेट घेणाऱ्या दोघांना दहशतवाद विरोधी पथकाने ( ATS) ने गुरूवारी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. एटीएसच्या पथकाकडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र या दोघांमध्ये एक परदेशी नागरिक आणि एका महिलेचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक कारागृहात कैदेत असणाऱ्या अबू सालेमला भेटण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जात आहे. यामुळे त्याला भेटण्यासाठी आलेल्या दोघानांही एटीएसच्या पथकाने ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर गँगस्टर अबू सालेम फरार झाला होता. अबू सालेमला १९ वर्षांपूर्वी पोर्तुगालमध्ये अटक करण्यात आली. त्याची मैत्रीण, चित्रपट अभिनेत्री मोनिका बेदीसह त्याला भारतात आणण्यात आले होते.

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुरुवातीला सालेमला शिक्षा भोगण्यासाठी मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र आर्थर रोड तुरुंगात सालेमवर हल्ला झाल्याने  त्याला नवी मुंबईतील तळोजा कारागृहातील अंडा सेल कक्षात हलवण्यात आले. मात्र तळोजाच्या अंडा सेलच्या दुरुस्तीमुळे सालेमची नुकतीच नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, आज त्याचा एक मित्र आणि एक परदेशी नागरिक त्याला या कारागृहात भेटण्यासाठी आले असता एटीएसने त्यांना ताब्यात घेतले. ते का आणि कोठून आले याचा तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button