गुन्हे

तरुणींना कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या चोरट्यांना बाणेर पोलीसांनी केले जेरबंद

पुणे : बाणेर टेकडीवर फिरायला आलेल्या इशान्येकडील राज्यातील ३ तरुणींना कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या चोरट्यांना बाणेर पोलिसांनी जेरबंद केले. या तरुणींकडील मोबाइल, सोने व रोकड लुटण्यात आली होती. यात दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे. द्रापेत उर्फ विशाल प्रभाकर समुखराव (वय १९, रा. कुंभार चाळ, बोराडेवाडी, चिखली, मूळ रा. म्हाळुंगी, ता. चाकूर, जि. लातूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर, त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दुचाकी आणि कोयता जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयानंद पाटील, उपनिरीक्षक प्रवीण चौगले, हवालदार श्रीकांत वाघवले, इरफान मोमीन, बाबा दांगडे, विशाल शिर्के यांनी केली.

बाणेर टेकडीवर (दि. १३ ऑक्टोबर) सायंकाळी अबिनीयू खांगबबो चवांग (वय ३६) ही तरुणी तिच्या चिंगमलिऊ पामेई, अपर पामेई या मैत्रिणींसोबत फिरायला गेली होती. त्यावेळी तिघांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील महागडे मोबाइल, इअर बड्स, पिशवी असा मुद्देमाल लुटला होता. तिघीही मूळच्या नागालँडमधील आहेत. अबिनीयू व चिगमलिऊ एका बीपीओत कामाला आहेत. या घटनेमुळे त्या प्रचंड घाबरल्या होत्या. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. तपास सुरू केल्यानंतर तपास सुरू केला. तांत्रिक तपासात आरोपी विशाल व साथीदारांनी लुटमारीचा गुन्हा केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यांना पकडले. पुढील तपास बाणेर पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button