ससून रुग्णालय ४ कोटी घोटाळा प्रकरण; न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालय गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. ललित पाटील प्रकरण, पोर्शे कार प्रकरणातील आरोपींच्या रक्ताचे नमुन्यातील आदलाबदली अशा प्रकरणांमुळे ससून रूग्णालाय चर्चेत आले होते. त्यानंतर गेल्या महिन्यातच ससूनमध्ये कर्मचाऱ्यांनीच चार कोटींचा घोटाळा केल्याचेही उघडकीस आले होते. ससून रूग्णालायतील आर्थिक घोटाळ्यांप्रकरणी रूग्णालय प्रशाससनाकडूनच गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याती १३ आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांचा हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लागला आहे. आरोपींच्या वतीने अतिरीक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी अटकपूर्व जामीनाला विरोध केला. आरोपींनी हा घोटाळा का केली, घोटाळ्यातील रक्कम कुणाला दिली, त्या रकमेचं नेमकं काय केलं, असे अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवणे महत्त्वाचे आहे. अटकपूर्म जामीन दिल्यास ही उत्तरे मिळणार नाही, त्यामुळे आरोपींना अकपूर्व जामीन मिळू नये, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने या आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला.
या प्रकरणी रुग्णालयाचे वरिष्ठ सहायक रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार, संतोष जोगदंड, वरिष्ठ लिपिक दीपक वालकोळी, सेवानिवृत्त सीटी स्कॅन तंत्रज्ञ उत्तम जाधव, कनिष्ठ लिपिक श्रीकांत श्रेष्ठ,राखी शहा, कक्षसेवक नीलेश शिंदे, अर्चना अलोटकर, अधिपरिचारिका सुमन वालकोळी, दयाराम कछोटिया, शेखर कोलार,अनिता शिंदे वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक संदीप खरात यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
गेल्या महिन्यात ससून रुग्णालयातील आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला. ससूनचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे यांना रुग्णालयाच्या शासकीय नोंदवहीत आर्थिक तफावत असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात त्यांनी वैद्यकीय संचलानायाच्या स्तरावर एक चौकशी समिती नेमली. या समितीने केलेल्या तपासात रुग्णालयात ४ कोटी १८ लाखांचां गैरव्यवहार केल्याचे उघड झाले. गोरोबा आवटे यांना या घोटाळा लक्षात येतील त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी रुग्णालयातील १६ कर्मचारी आणि ७ खासगी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.