मनोरंजन 

ZEE 5 वर ‘धर्मवीर २’ चरित्रपटाचे जागतिक डिजिटल प्रीमियर सुरु!

ZEE5 या एतद्देशीय व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि बहुभाषिक कथा सादर करणाऱ्या प्लॅटफॉर्मला ‘धर्मवीर २ मुक्काम पोस्ट ठाणे’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाचे जागतिक डिजिटल प्रीमियर सादर करत असून, चाहत्यांना या गोष्टीचा खूप आनंद होत आहे. या राजकीय चरित्रपटात शिवसेना नेते आनंद दिघे यांची असामान्य गोष्ट पाहायला मिळणार आहे. ‘वारशाची मशाल हाती असलेले’ अशी त्यांची ओळख आहे. प्रसाद ओक आणि क्षितिश दाते यांनी दिघे यांची गोष्ट आपल्या दमदार अभिनयातून जिवंत केली असून क्षितिश यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रवीण तरडे यांचे दिग्दर्शन आणि झी स्टुडिओ आणि साहिल मोशन आर्ट्स यांची निर्मिती असलेला हा बहुप्रतीक्षीत सिक्वेल ZEE5 वर स्ट्रीम केला जाणार आहे. ‘धर्मवीर २’ ची गोष्ट पहिल्या सिनेमाच्या शेवटापासून पुढे सुरू होणार आहे. त्यामध्ये कोणत्या प्रमुख घटकांमुळे एकनाथ शिंदे २०२२ मध्ये शिवसेनेतून बाहेर पडले होते ते दाखवण्यात आले होते. या सिनेमात राजकीय निष्ठा आणि महत्त्वाकांक्षेची आव्हानं, दिघे यांचे वारसदार या नात्याने शिंदे यांचा प्रवास आणि राजकीय पटलावरीर आव्हानांतून मार्ग काढताना आलेली आव्हानं पाहायला मिळणार आहे. महेश लिमये यांची देखणी सिनेमेटोग्राफी आणि श्रवणीय संगीतामुळे हा सिक्वेल आजच्या प्रेक्षकांना आपलेसे वाटणारे आणि आनंद दिघे यांच्या वारशाचा सन्मान करणारी गोष्ट दाखवणारा आहे.

ZEE5 इंडियाचे प्रमुख व्यवसाय अधिकारी मनीष कालरा या चित्रपटाबाबत म्हणाले, ‘वैविध्यपूर्ण आणि गुंतवून ठेवणारा कंटेट देणारा प्लॅटफॉर्म या नात्याने ‘धर्मवीर २’ प्रादेशिक सिनेमांच्या आमच्याकडे असलेल्या संग्रहात महत्त्वाची भर घालणारा आहे. याची कथा आजच्या राजकीय परिस्थितीशी सुसंगत आहे आणि आम्हाला खात्री आहे, की याची दमदार कथा आणि जबरदस्त अनुभव यांमुळे प्रेक्षकही खिळून राहातील. ZEE5 मध्ये आम्ही वास्तवादी गोष्ट असलेल्या कंटेटला प्राधान्य देतो. अस्सल व्यक्तीरेखांचा समावेश असलेला धर्मवीर 2 सिनेमा आमच्या त्याच बांधिलकीचे प्रतीक आहे.’ असे ते म्हणाले आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले, ‘धर्मवीर सिनेमाचा सिक्वेल तयार करण्याची संधी मिळणं हा समृद्ध करणारा प्रवास होता. चरित्रपट तयार करणं हे एक सुंदर आव्हान असतं आणि मी तो करताना आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्या व्यक्तीमत्त्वांशी खऱ्या अर्थाने प्रामाणिक राहात खिळवून ठेवणारी गोष्ट सांगण्याचं ध्येय ठेवलं होतं. प्रेक्षकांकडून मिळालेलं प्रेम खऱ्या अर्थाने समाधान देणारं आहे. प्रसाद ओक आणि क्षितिश दाते यांनी केलेली मेहनत, त्यांचा ध्यास आणि अभिनय कौतुकास्पद आहे. या सिनेमानं इतिहास घडवला. ZEE5 वर त्याचे प्रीमियर होत असून हा प्रवास जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी उत्सुक आहे. प्रेक्षकांचं हे प्रेम यापुढेही वृद्धींगत होत राहील अशी मला आशा वाटते.’ असे त्यांनी सांगितले. प्रेक्षकांना ‘धर्मवीर २’ हा चित्रपट केवळ ZEE5 वर येत्या २५ ऑक्टोबरपासून पाहाता येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button