महाराष्ट्र

शहरात भरणारे आठवडा बाजारातील फेरीवाल्यांवर महापालिकेने कारवाई करण्याची मागणी

विरार : वसई -विरार शहराची लोकसंख्या अंदाजे ३२ लाखांचा घरात गेली आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे शहराचे शहरीकरण वाढू लागले आहे. याचाच फायदा घेत वसई- विरार शहरात १५० हून अधिक ठिकाणी अनधिकृत बाजार भरवले जात आहेत. मात्र पालिकेच्या दफ्तरी केवळ ४ आठवडी आणि २४ दैनंदिन बाजारांना परवानगी देण्यात आली असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. यामुळे उर्वरित बाजारांवर पालिकेने कारवाई केली पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वसई -विरार शहरात मिळेल त्या ठिकाणी अनधिकृत बाजार चालवले जात असल्याचे सत्र मोठ्या जोमात सुरू झाले आहे. हे बाजार चालवणारे पालिकेला न जुमानता हजारो फेरीवाल्यांना बसवून प्रत्येकी फेरीवाल्याकडून ४०० ते ५०० रुपये उकळतात. बाजारात पालेभाज्या, कडधान्य, मसाले, कांदा, बटाटा अन्य गृह उपयोगी वस्तू तसेच प्लास्टिक पासून बनवलेले साहित्य जास्त प्रमाणात विक्रीसाठी आणले जाते. यामुळे या बाजारात खरेदी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी असते. परंतु फेरीवाले बाजार संपल्यानंतर भाजीपालाची आवरणे, खराब झालेला भाजीपाला, या सोबतच प्लास्टिकच्या रिकाम्या पिशव्या यांची विल्हेवाट न लावता तो विविध प्रकारचा कचरा जाग्यावरच टाकून जात असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते.

मात्र, ही दुर्गंधी पालिकेला साफ करावी लागते. यामुळे पालिकेला याचा आर्थिक तोटा देखील सहन करावा लागत आहे. सुज्ञान नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार अनधिकृत बाजार चालवणार्‍यांकडून पालिकेचा कोटी रुपयांच्या फेरीवाले कर देखील बुडवला जातो. असाच विरार पूर्वेकडील चंदनसार या ठिकाणी अनधिकृत बाजार भरवला जात असल्याचे दिसून आले आहे. हा अनधिकृत आठवडा बाजार अनेक वर्षांपासून सुरू आहे. हा बाजार आठवड्यातून मंगळवारी व शनिवारी असा दोन दिवस भरवला जातो. या ठिकाणी तीनशे ते चारशे दुकाने असतात. हजारोंच्या संख्येने नागरिक खरेदी करण्यासाठी येत असतात. परंतु हा बाजार संपल्यानंतर फिरवाले निघालेला कचरा उचलून कचराकुंडीत न टाकता हा कचरा रस्त्यावरच पडून असतो. यामुळे येथील ये-जा करणार्‍या नागरिकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतो, असे तेथील स्थानिक नागरिकांनी बोलताना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button