जीवनशैली

जास्त मीठ खाण्याची सवय नुकसानकारक ; ‘या’ आजारांचा वाढतो धोका

आरोग्य : मीठ हा आपल्या स्वयंपाक घरातील महत्त्वाचा घटक आहे. मिठाशिवाय अन्नाला चव येणे शक्यच नाही. मीठ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे प्रत्येकजण त्याचे सेवन करतो. मात्र, जास्त मीठ खाण्याची सवय असेल तर ही सवय समस्या निर्माण करू शकते. जेवणात मिठाचा वापर केल्यामुळे जेवणाला चव येते, पण मिठाचे अधिक सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते. मिठाच्या अतिसेवनाने हृदयविकार, रक्तदाब यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. तज्ञांच्या मते, दररोज ९ ते १२ ग्रॅम मिठाचे सेवन शरीरासाठी आवश्यक आहे.

किडनीमध्ये काही प्रमाणात सोडियम आढळत असल्यामुळे शरीरात जास्त सोडियमचे सेवन झाल्यावर किडनीला जास्त पाणी साठवून ठेवावे लागते. शरीरात क्षाराचे प्रमाण जास्त असताना पाण्याची गरज असते. या स्थितीला वॉटर रिटेन्शन असे म्हणतात. अशा स्थितीत हात, पाय आणि चेहऱ्यावर सूज येते. जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब वाढू शकतो. ज्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन होऊ शकतात. यासोबतच उलट्या, मळमळ आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणे दिसू लागतात.

जास्त मीठ असलेले अन्न खाल्ल्याने वारंवार तहान लागते. त्यामुळे वारंवार लघवी होऊ शकते. मिठात सोडियमचे प्रमाण जास्त असल्याने या समस्या उद्भवतात. यामुळे हायपरनेट्रेमिया होतो. हायपरनेट्रेमियावर वेळीच उपचार न केल्यास मृत्यूदेखील होऊ शकतो. जास्त मीठ खाल्ल्याने डिहायड्रेशनमुळे वारंवार डोकेदुखी होऊ शकते. यामुळे मायग्रेनची समस्या निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत, हा त्रास टाळण्यासाठी, भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.

४० टक्के सोडियम आणि ६० टक्के क्लोराईडने मीठ बनलेले असते. सोडियम आणि क्लोराईड शरीरातील पाणी आणि खनिजांचे संतुलन राखण्याचे काम करतात. पण मिठाचे जास्त प्रमाणात सेवन केले तर शरीराला खूप नुकसान होऊ शकते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार जास्त मिठाचे सेवन केल्यामुळे रक्तदाब, पोटाचा कर्करोग, किडनीचे आजार, हृदयविकार, अकाली मृत्यू यांसारखे जीवघेणे आजारही होऊ शकतात.

टीप : कोणतेही उपचार, डाएट आणि औषध तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button