गुन्हे

वैद्यकीय पदवी नसताना केला व्यवसाय; पुण्यात तोतया डॉक्टरचा पोलिसांनी केला पर्दाफाश

पुणे : वैद्यकीय पदवी नसताना देखील वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या एका तोतया डॉक्टरवर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तो गेल्या काही महिन्यांपासून दवाखाना चालवित असल्याचे समोर आले असून, नुकताच वारजेत देखील अशाच एका तोतया डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पांडुरंग बबनराव देवडकर (वय ४०, रा. पायस सोसायटी, लोकमान्यनगर, नवी पेठ) असे गु्न्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत डॉ. गोपाळ उजवनकर (वय ३८) यांनी विश्रामबाग पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, देवडकरकडे वैद्यकीय पदवी नाही. तरीही तो नाडी परीक्षण करुन नागरिकांना ओैषध देत होता. याबाबतची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानूसार चौकशी करण्यात आली. तेव्हा देवडकर याच्याकडे वैद्यकीय पदवी तसेच व्यवसायाचे प्रमाणपत्र नसल्याचे उघड झाले. महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर्स ॲक्ट १९६१ चे कलम ३३ (१) उल्लंघन केल्याप्रकरणी देवडकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक खाडे तपास करत आहेत.

पुणे शहरात वैद्यकीय पदवी नसताना व्यवसाय करणाऱ्या तोतया डॉक्टरांचा सुळसुळाट झाल्याचे दिसत असून, वारजेत देखील नुकताच एका तोतया डॉक्टरचा पर्दाफाश झाला होता. नंतर जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात कोरेगाव येथे बनावट नाव व वैद्यकीय पदवीचा वापर करून रुग्णांवर उपचार करणाऱ्या मेहमूद फारुक शेखला अटक केली होती. शेख महेश पाटील या बनावट नावाने रुग्णालय चालवत होता. शेखचे शिक्षण दहावीपर्यंत झाले. नंतर नांदेड येथे खासगी रुग्णालयात तो कंपाउंडर म्हणून काम करीत होता. दरम्यान, मुंढव्यातही शस्त्रक्रिया विभागात काम करणाऱ्याने निवृत्तीनंतर उत्तर प्रदेश येथून संघटनेचे प्रमाणपत्र घेऊन दवाखाना थाटल्याचे उघडकीस आले होते. तर, त्यापुर्वी लोणी काळभोर भागात तोरणे नावाच्या तोतया डॉक्टरला अटक केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button