गुन्हे

मेघवाडी पोलिसांची कारवाई; दोन पिस्तुल, जिवत काडतुसेसह सराईत आरोपीला केली अटक

मुंबई : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दररोज राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून खून, हाणामारी, गाड्यांची तोडफोड तसेचं चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. यामुळे नागरिकांसोबतचं पोलीसही हैराण झाले आहेत. अशातचं आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मेघवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दोन पिस्तुल, जिवत काडतुसे आणि दहा लाख रुपये रोख रकमेसह सराईत आरोपीला मेघवाडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी शस्त्राची विक्री करण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गौस मोहिद्दीन शहाबुद्दीन सय्यद असे आरोपीचे नाव आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सम्राट वाघ व पोलीस शिपाई दत्तात्रेय बागुल यांना सराईत आरोपी जोगेश्वरी पूर्व येथे शस्त्रांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे जोगेश्वरी पूर्व येथील पश्चिम द्रुतगती मार्गाजवळील रामगड परिसरात पोलिसांना सापळा रचला होता होता. आरोपी गौस मोहिद्दीन शहाबुद्दीन सय्यद येथील पाण्याच्या टाकीजवळ येऊन उभा राहिला होता. त्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याला घेराव घातला. आरोपी पळण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी त्याला ताब्यात घेण्यात आले.

आरोपीची झडती घेतली असता त्याच्या जवळ १० लाख रुपये रोख रक्कम, देशी बनावटीच्या दोन पिस्तुल, सहा जिवंत काडतुसे असा एकूण ११ लाख रुपयांचा मुद्देमाल सापडला. आरोपीविरोधात भारतीय शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. आरोपी सराईत गुन्हेगार असून, यापूर्वीही मेघवाडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून देशी बनावटीच्या दोन पिस्तुल हस्तगत करण्यात आल्या असून, त्याची विक्री करण्यासाठी आरोपी जोगेश्वरी येथे आला होता. यापूर्वीही आरोपीने अशाच प्रकारे शस्त्रांची विक्री केल्याचा संशय आहे. त्या शस्त्रांच्या विक्रीचे १० लाख रुपये आरोपीकडे मिळाल्याचा संशय आहे. त्यामुळे आरोपीने यापूर्वी कोणाला शस्त्रांची विक्री केली, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button