
वृत्तसंस्था : प्रयागराज येथील महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६० जण जखमी झाले आहेत. या घटनेची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री योगी यांनी एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. चेंगराचेंगरीबद्दल बोलताना मुख्यमंत्री योगी आदिनाथ भावुक झाले होते. दरम्यान मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. ही घटना अत्यंत दुःखद आहे. भक्तांच्या निधनाने मला खूप दुःख झालं आहे, हा प्रसंग मला खूपच वेदना देणारा आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांप्रती संवेदना आहेत. आम्ही काल रात्रीपासून न्यायाधिकरण आणि पोलिस प्रशासनाच्या संपर्कात आहोत आणि जे काही व्यवस्था करता येईल ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, राज्य सरकारच्या वतीने आम्ही मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करत आहोत. न्यायिक आयोग संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेल आणि निर्धारित वेळेत राज्य सरकारला आपला अहवाल सादर करेल. या संदर्भात, मुख्य सचिव आणि डीजीपी स्वतः एकदा प्रयागराजला भेट देतील आणि गरज पडल्यास त्या सर्व मुद्द्यांचा आढावा घेतला जाईल.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, ही घटना हृदयद्रावक आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे अशा सर्व कुटुंबियांप्रती आम्ही आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. आम्ही काल रात्रीपासून प्रशासनाशी सतत संपर्कात आहोत. निष्पक्ष अधिकारी, पोलिस, प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि इतर सर्व व्यवस्था तेथे तैनात करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, मौनी अमावस्येला पवित्र स्नान करण्यासाठी काल संध्याकाळी ७ वाजल्यापासून प्रयागराजमध्ये मोठ्या संख्येने भाविक जमले होते. आखाडा मार्गावर एक दुर्दैवी घटना घडली, अपघातात ९० हून अधिक लोक जखमी झाले. यामध्ये ३० जणांचा मृत्यू झाला. प्रयागराजमध्ये ३६ जणांवर उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. देशासह संपूर्ण जगामध्ये महाकुंभमेळ्याची चर्चा सुरु आहे. 144 वर्षांनी आलेल्या या महाकुंभासाठी कोट्यवधी भाविक लोटले आहे. मौनी अमावस्येच्या निमित्ताने ही गर्दी वाढली होती. मौनी अमावस्येमुळे अमृत स्नानाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र महाकुंभमेळ्यामध्ये दुर्घटना झाली आहे. महाकुंभातील संगमवर असलेलं एक बॅरिअर तुटल्याने चेंगराचेंगरी झाली. या घटनेवरुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये चर्चा झाली.